Pakistan Sikh Man Beaten : पाकिस्तानात शीख व्यक्तीला नग्न करून मारहाण

अमृतसर (पंजाब) – पाकिस्तानमध्ये एका शीख व्यक्तीला शिखांचा सण बैसाखी साजरी केल्यावरून नग्न करून मारहाण करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. पाकमधील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ने (टी.एल्.पी.ने) या घटनेचा व्हिडिओही बनवला आहे. भाजप शीख नेते मनजिंदरसिंह सिरसा यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून भारत सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना ‘टॅग’ (सूचित करणे) करत मनजिंदरसिंह सिरसा यांनी लिहिले की, तेथील अल्पसंख्य शीख आणि हिंदु यांच्यावर जिहाद्यांच्या अत्याचाराबाबत पाकिस्तान सरकार आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ प्रत्येक वेळी मौन बाळगतात हे दुःखद आहे.

संपादकीय भूमिका

  • खलिस्तानची मागणी करणारे भारत, तसेच कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील शीख आता गप्प का आहेत ? कि त्यांना हे मान्य आहे ?
  • खलिस्तानी आतंकवादी पन्नू यावर का तोंड उघडत नाही ?