मंदिरे कह्यात घेऊन ती योग्यरित्या न चालवणारे राज्य सरकार !

व्यावसायिक आस्थापने चालवता न येणारे सरकार मंदिरे कह्यात घेऊन त्यांतही आर्थिक अनियमितता आणणार नाही कशावरून ?

मंदिरापासून ११४ मीटर अंतरावर असलेला बिअर बार हटवण्याचा आदेश देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !

हिंदु राष्ट्रात मद्यावर बंदी असेल, त्यामुळे असे प्रश्नच निर्माण होणार नाहीत !

महोबा (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवून दर्गा बनवण्याचा प्रयत्न

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही समाजकंटकांचे असे धाडस होतेच कसे ?

‘स्टॅलिन’ सरकारच्या वल्गना आणि हिंदूंचे कर्तव्य !

देशभरातील हिंदूंनी प्रांतीय कक्षा विस्तारून हिंदु म्हणून संघटित होऊन मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. मंदिरांचे पावित्र्य टिकले, तरच पुढील कठीण काळात हिंदू टिकतील (हिंदूंचे अस्तित्व राहील), हे लक्षात घ्यायला हवे !

तमिळनाडूतील मंदिरांचे २ सहस्र १३८ किलो सोने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयाची मनाई !

असा अधिकार नास्तिकतावादी द्रमुकच्या सरकारला कुणी दिला ? द्रमुकने असा हस्तक्षेप अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात करण्याचे धाडस केले असते का ?

पुरोहितांनी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे आमदार त्रिवेंद्रसिंह रावत यांना दर्शन घेण्यापासून रोखले !

उत्तराखंड सरकारने यापूर्वी पुरोहितांना मंदिर सरकारीकरणाचा हा प्रस्तावित कायदा रहित करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र अद्याप हे आश्‍वासन न पाळल्याने पुरोहितांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात रोष आहे.

हिंदूंच्या मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा आणावा ! – विहिंपची केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांच्याकडे मागणी

मुळात अशी मागणीच करावी लागू नये. केंद्र सरकारने स्वतःहून हिंदूहिताचे कायदे केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

तुळजापूर आणि शनिशिंगणापूर या देवस्थानांकडे सरकार ५ वर्षे फिरकलेच नाही ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे ते विकावे लागत आहेत. मग कोणत्या तोंडाने सरकार ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’, असे म्हणते ?

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – अधिवक्ता किरण बेट्टादपूर, कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटकात ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले असून तेथील देवनिधीचा उपयोग योग्य पद्धतीने केला जात नाही. हा ‘कुंपणानेच शेत खाण्याचा’ संतापजनक प्रकार आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे नियम सदोष आहेत.

मंदिरात शासकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे तेथील भक्तीभावाचा लय ! – सी.एस्. रंगराजन्, मुख्य पुजारी, चिल्कुर बालाजी मंदिर

मंदिरांमध्ये शासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केल्यामुळे तेथील भक्तीभाव लोप पावत चालला आहे. भक्तीमार्गाची शिकवण देण्यासाठी मंदिरे सुरक्षित रहाणे आवश्यक आहे.