यवतमाळ येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अनुष्का करोडदेव हिचा जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक

 यवतमाळ येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अनुष्का करोडदेव हिचा जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक

सनातनची साधिका कु. अनुष्का करोडदेव हिची ‘विज्ञान अमर रहे’ या नाटिकेमध्ये उत्कृष्ट अभिनय केल्याविषयी मुलींमधून प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. या वेळी शाळेचे शिक्षक श्री. पळसकर यांनी तिचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

 असा झाला श्री भवानीदेवीच्या आगमनाचा अविस्मरणीय सोहळा !

 असा झाला श्री भवानीदेवीच्या आगमनाचा अविस्मरणीय सोहळा !

‘श्री भवानीदेवीचे शुभागमन होणार’, या आनंदात आश्रमातील साधक-साधिकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ देणारी श्री भवानीदेवी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ देण्यासाठी आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी प्रत्यक्ष आश्रमात येत आहे’, असा साधकांचा भाव होता.