श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !

पंढरपूर – आषाढी यात्रेच्या निमित्ताने एका दानशूर भाविकाने त्याचे नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सोन्याच्या पादुका दान स्वरूपात अर्पण केल्या आहेत. या पादुकांचे वजन ४४६ ग्रॅम असून त्याचे अनुमाने मूल्य ५६ लाख ५९ सहस्र रुपये आहे.

या वेळी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम, तसेच अन्य उपस्थित होते.