जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !

मुंबई – अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथील मेसर्स जे.के. सोप बाजार येथे घातलेल्या धाडीत संबंधित आस्थापनामध्ये विनालेबल साबण विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. या कारवाईत अंदाजे १० लाख ९३ सहस्र ६८२ रुपये किंमतीचा साबण जप्त करण्यात आला असून साबणाचे २ नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी मालक नबी उल्लाह यांच्या विरोधात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली.

जप्त केलेल्या साबणांवर बॅच, उत्पादन क्रमांक, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत, उत्पादन परवाना क्रमांक, तसेच उत्पादकाचे नाव आणि पत्ता आदी कायद्याने आवश्यक असलेली माहिती नमूद करण्यात आली नव्हती.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !