
वास्को, १७ जुलै (वार्ता.) – कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाज यांनी १७ जुलै या दिवशी स्थानिक ग्रामस्थांसह वेर्णा येथे वेर्णा-वास्को महामार्गालगत असलेल्या वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका आस्थापनात जेवण पुरवणार्या केंद्राची पहाणी केली.
या ठिकाणी केंद्रामध्ये पंपाच्या साहाय्याने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी सोडले जात असल्याचे आमदार आंतोन वाज यांच्या निदर्शनास आले. पहाणीच्या वेळी संबंधित केंद्रात अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत अन्न बनवले जात असल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन आमदार वाज आणि ग्रामस्थ यांनी आरोग्य विभाग, तसेच अन्न आणि औषध प्रशासन (एफ्डीए) यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. संबंधित केंद्रावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद