२ महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांची तक्रार

पुणे – ‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’तील (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ) चंद्रपूर इमारतीसाठी वास्तूविशारदाची नियुक्ती, पुण्यातील जानकीदेवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’मधील समस्या, आयटीईपी कार्यालयातील अनियमितता, ‘विद्यापीठ कायदा २०१६’चे उल्लंघन याची चौकशी करण्यासाठी उपसचिव उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अमोल मुत्याल यांची ‘चौकशी अधिकारी’ म्हणून नियुक्ती केल्याचा खुलासा राज्य सरकारने केला आहे. याविषयी विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील सदस्या पौर्णिमा मेहता यांनी शासनाकडे तक्रार केली होती.
१. चौकशी अधिकार्यांना चौकशीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे दायित्व विद्यापिठाच्या कुलसचिवांचे रहाणार आहे.
२. चौकशीच्या कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी, लागणारे साहित्य आणि इतर अनुषंगिक गोष्टी उपलब्ध करून देण्याचे दायित्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, मुंबई यांच्याकडे दिले आहे.
३. चौकशी अधिकार्यांनी शिफारशींसह आपला अहवाल २ महिन्यांत शासनाला सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत.
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा