५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !

गिरीजा राऊत छळ प्रकरण

भोंदूबाबा फिरोज शेख आणि गिरीजा राऊत 

ठाणे, १७ जुलै (वार्ता.) – गिरीजा राऊत यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीनुसार छळ, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्याच्या अन्वेषणात कापूरबावडी पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील रूपेश राऊळ, मायकल डिसोझा, संजय परब, अमित नाईक आणि बाळा पेडणेकर यांना बी.एन्.एस्.एस्. कलम १७९ अन्वये उपस्थित रहाण्यासाठी समजपत्र बजावण्यात आले आहे.

या प्रकरणी भोंदूबाबा फिरोज शेख आणि त्याचा साथीदार राम यल्लाप्पा वडार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.