
मालवण – सिंधुदुर्ग किल्ल्याच्या २ क्रमांकाच्या बुरुजाच्या पायथ्याच्या बाजूचे काही दगड कोसळले आहेत. लवकरात लवकर या भागाच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. ‘याविषयी वरिष्ठ कार्यालयास माहिती देण्यात आली असून पुढील कार्यवाही चालू आहे’, असे पुरातत्व विभागाच्या स्थानिक अधिकार्यांनी सांगितले.
किल्ल्याच्या बुरुजाचा काही भाग कोसळल्याचे स्थानिक रहिवासी मंगेश सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. वादळी हवामान आणि समुद्राच्या प्रचंड लाटा यांमुळे किल्ल्याच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या २ क्रमांकाच्या बुरुजाच्या पायाचे दगड मोठ्या प्रमाणात पडल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी किल्ल्याच्या दुरवस्थेबाबत पुरातत्व विभागाकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. किल्ल्याच्या संरक्षणासाठी दीर्घकालीन उपाययोजना आणि तातडीची दुरुस्ती आवश्यक असल्याची मागणी करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रतिवर्षी लाखो पर्यटक आणि शिवप्रेमी येत असतात. अशा परिस्थितीत तटबंदी आणि बुरुज यांची झालेली हानी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक