पती, सासरे आणि प्रेयसी यांच्यावर गुन्हा नोंद !

भिवंडी – पतीला सोडण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडून १२ लाखांची मागणी केली आहे. या घटनेत पतीनेही पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करत तिचा शारीरिक अन् मानसिक छळ केला. या प्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीसह प्रेयसी आणि सासरे यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पती महंमद उमर कलीम कादरी, सासरे महंमद कलीम कादरी, प्रेयसी अंजू बाग अशी गुन्हा नोंदवलेल्यांची नावे आहेत.
पीडित २६ वर्षीय तरुणीचा छत्तीसगड येथील उमर कादरी याच्याशी निकाह झाला. लग्न झाल्यापासून म्हणजे ५ डिसेंबर २०२३ पासून जुलै २०२६ पर्यंत पीडितेला पतीने मारहाण केली. प्रेयसीने पीडितेकडून पतीला सोडण्यासाठी १२ लाख रुपयांची मागणी केली.
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश