बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद

पुणे – शहरातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी सौ. वर्षा शेडगे यांच्यासह १४ जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चित्रफित प्रसारित केली आहे. त्यात वेगवेगळ्या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. त्यातील एक व्यवहार ‘वक्फ बोर्डा’चा असल्याचेही समजते.