
वाशी – वाशी येथे २५ जुलै या दिवशी कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर डोग्रा समाज आणि सावरकर विचार मंच अन् कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाशीतील ‘कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय’ येथे सकाळी १०.३० वाजता होणार्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून कर्नल (निवृत्त) नरेशकुमार गोयल हे उपस्थित रहाणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. शुभदा नायक असणार आहेत. कारगिलच्या दुर्गम टेकड्यांवर अगम्य धैर्याने शत्रूचा पराभव करणार्या भारतीय वीरांनी दाखवलेल्या शौर्याची माहिती या वेळी दिली जाणार आहे.
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !