
नाशिक – जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल अभियानांतर्गत आयोजित ५५ व्या ‘वॉटर सिरिज वेबिनार’मध्ये नाशिक जिल्ह्यात ‘कॅच द रेन’ (‘पावसाचे पाणी साठवा’) अभियानांतर्गत राबवलेल्या ‘जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन’ या प्रभावी उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यात आली. ‘बेस्ट प्रॅक्टिस ऑफ वॉटर मॅनेजमेंट’ (उत्तम पाणीव्यवस्थापन राबवणे) या विषयावरील चर्चासत्रामध्ये विशेष वक्ते म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सहभागी झाले होते. लोकसहभाग, विभागीय समन्वय आणि विविध शासकीय योजना यांच्या प्रभावी कार्यवाहीच्या माध्यमातून उभारलेल्या जलसंवर्धन योजनेचे त्यांनी सादरीकरण केले. नाशिकमध्ये जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे त्यांनी सागितले.
या वेळी त्यांनी ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, नाला खोलीकरण आणि रूंदीकरण, कृत्रिम भूजल पुनर्भरण विहिरी (रिचार्ज शाफ्ट), पर्जन्यजल संधारण, सूक्ष्म सिंचन, जलअर्थसंकल्प (वॉटर बजेटिंग), जलकार्यक्षम शेती, तसेच ‘जलतारा’ या उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !