
पिंपरी – शाळेतील प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक सहलींचा खर्च आदी प्रकरणांत आर्थिक अपव्यवहार करून ‘डॉ. डी.वाय. पाटील बी – स्कूल’ या शैक्षणिक संस्थेची ४ कोटी ९८ लाख ६६ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी संचालक अमोल गावंडे यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. फसवणुकीचा प्रकार १ ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ताथवडे येथील ‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये घडला. ‘डॉ. डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटी’च्या खजिनदार असलेल्या महिला पदाधिकार्याने यासंदर्भात तक्रार नोंदवली होती. गावंडे संस्थेचे संचालक, तसेच ‘डॉ. डी.वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापिठा’चे प्र-कुलगुरु म्हणून कार्यरत होते. संस्थेचा दैनंदिन कारभार, आर्थिक व्यवहार, प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी वेतन, प्रवेश सल्लागारांची देयके, तसेच विविध खर्चांना संमती देणे आदी काम आरोपीच्या नियंत्रणाखाली होते. (शैक्षणिक संस्थेच्या प्र-कुलगुरूंनीच असे कृत्य करणे लज्जास्पद आहे. – संपादक) संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमिततेचा संशय आल्याने संस्थेने ‘ए.झेड.बी.अँड पार्टनर्स’ या संस्थेकडून फॉरेन्सिक लेखापरीक्षण (संस्थेच्या आर्थिक नोंदीचे सखोल अन्वेषण) केले. संस्थेमध्ये अंतर्गत चौकशी चालू झाल्यानंतर आरोपीने गोपनीय माहिती, तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा