१. ‘धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे. आम्ही आध्यात्मिक संशोधन करत आहोत. विज्ञान आणि अध्यात्म आपल्याला जोडायचे आहे. युरोपात बनवलेल्या एका यंत्राद्वारे टिळा लावलेल्या साधकाचे परीक्षण केले जाते. ‘पिप (पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरेन्स फोटोग्राफी) टेक्नॉलॉजी’द्वारे हे करण्यात येते. धर्मशास्त्रात आज्ञाचक्राच्या ठिकाणी टिळा लावण्यास सांगितले आहे. तेथे टिळा लावल्यानंतर त्याचा काय लाभ होतो, हे यंत्राद्वारे पाहिले असता मनुष्याच्या प्रभावळीभोवती सात्त्विक आणि सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे दिसून आले. या संशोधनाचे कार्य गोवा येथील आश्रमात चालू आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्षेत्रांत तसे संशोधन चालू आहे. विज्ञानाचे साहाय्य घेऊन सनातन धर्म आणि परंपरा यांना आम्ही पूर्णतः सिद्ध करत आहोत. त्यामुळे संपूर्ण विश्व आज आमच्याकडे आकर्षित होत आहे.
२. ‘विध्वंस टाळून उत्तम समाजव्यवस्था आणण्यासाठी सर्वांनी साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे.’
३. ‘मुसलमानांना धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था राज्यघटनेत आहे; परंतु हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था राज्यघटनेत का नाही ?’
४. ‘अनेक जण प्रतिदिन गीता वाचतात. गीता वाचण्याला महत्त्व नाही. ‘त्यानुसार आचरण केल्यासच गीतेचा लाभ करून घेतला’, असे म्हणता येईल.’