परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान

गुंज येथील संत कालिदास महाराज

परभणी – गुंज येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान झाले. छत्रपती संभाजीनगर येथे टेंब्येस्वामींच्या सोहळ्यावरून परततांना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. त्यांच्या कुटुंबातील एका महिलेचाही यात मृत्यू झाला आहे.  संत कालिदास महाराज यांनी ४० वर्षे मौन पाळले होते. त्यांचा भक्त परिवार मोठा होता. त्यांच्या देहावसानामुळे भक्त परिवारात शोककळा पसरली आहे.