परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांतून (पावलांतून) पुष्कळ प्रमाणात, तर त्यांच्या उजव्या चरणाच्या अंगठ्यातून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे
हिंदु धर्मात संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा व्यक्ती संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करते, तेव्हा तिला संतांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता येते. यातून हिंदु धर्मात प्रत्येक कृतीला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे, हे लक्षात येते.