कु. शर्वरी कानस्कर हिने ‘फ्यूजन’ आणि पाश्‍चात्त्य संगीत यांवर आधारित गीतांवर केलेल्या नृत्यापेक्षा भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित केलेल्या कथ्थक नृत्याचा सर्वांवर सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

नृत्याविषयी नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

नृत्य करतांना कु. शर्वरी कानस्कर
सौ. मधुरा कर्वे

‘छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील कु. शर्वरी कानस्कर हिने गोवा येथील सनातनच्या आश्रमात भारतीय शास्त्रीय कथ्थक नृत्य, तसेच ‘फ्यूजन’ संगीत (दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रकाराच्या संगीताचे मिश्रण) आणि पाश्‍चात्त्य संगीत यांवर आधारित गीतांवर नृत्य सादर केले. ‘या तिन्ही प्रकारे सादर केलेल्या नृत्याचा साधक-दर्शकांवर, तसेच तिच्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेली १ साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेला १ साधक हे दर्शक म्हणून सहभागी झाले होते. या चाचणीत एकूण ३ प्रयोग घेण्यात आले.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

अ. पहिल्या प्रयोगात शर्वरीने भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित कथ्थक नृत्यातील ‘तोडे’ हा प्रकार ‘झपताल’मध्ये सादर केला.

आ. दुसर्‍या प्रयोगात तिने ‘फ्यूजन’ (Fusion) संगीतावर आधारित ‘Shape Of You’ या इंग्रजी गाण्यावर नृत्य सादर केले.

इ. तिसर्‍या प्रयोगात तिने पाश्‍चात्त्य संगीतावर आधारित ‘तेनू काला चश्मा जचदावे गोरे मुखडे पे’ या हिंदी गाण्यावर नृत्य सादर केले.

तिन्ही प्रयोगात नृत्य करण्यापूर्वी आणि नृत्य केल्यानंतर कु. शर्वरीची, तसेच ते नृत्य पहाण्यापूर्वी आणि नृत्य पाहिल्यानंतर साधक-दर्शकांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – चाचणीतील तिन्ही नृत्य प्रयोगांचा शर्वरी आणि साधक-दर्शक यांच्यावर झालेला परिणाम

टीप – ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी १४० अंशाचा कोन केला. (‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.)

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. शर्वरीने ‘फ्यूजन’, तसेच पाश्‍चात्त्य संगीत यांवर आधारित गीतांवर नृत्य केल्यानंतर तिच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि तिच्यातील सकारात्मक ऊर्जा अल्प झाली. तिने भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित शास्त्रीय नृत्य केल्यानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. ‘फ्यूजन’, तसेच पाश्‍चात्त्य संगीत यांवर आधारित नृत्य पाहिल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तिने भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित शास्त्रीय नृत्य पाहिल्यानंतर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

३. ‘फ्यूजन’, तसेच पाश्‍चात्त्य संगीत यांवर आधारित नृत्य पाहिल्यानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली आणि त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा अल्प झाली. त्याने भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित शास्त्रीय नृत्य पाहिल्यानंतर त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. भारतीय शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक पाया असल्याने त्यातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होणे : भारतीय शास्त्रीय संगीताला (गायन, वादन, नृत्य) आध्यात्मिक पाया असल्याने त्यातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होते. सात्त्विक संगीतामुळे जिवाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. जीव साधना करणारा अथवा आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असेल, तर तो लाभ होण्याचे प्रमाण अधिक असते.

शर्वरीने चाचणीतील पहिल्या प्रयोगात ‘कथ्थक’ हा भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार सादर केला. तिच्याकडेे सात्त्विक स्पंदने आकृष्ट होऊन नृत्याच्या माध्यमातून ती स्पंदने वातावरणात प्रक्षेपित झाली. त्यामुळे चाचणीतील दोन्ही साधक-दर्शकांना, तसेच शर्वरीला पुढीलप्रमाणे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.

१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

२. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक आणि शर्वरी यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२ आ. ‘फ्यूजन’ आणि पाश्‍चात्त्य संगीत हे असात्त्विक असल्याने त्यांतून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : भारतीय शास्त्रीय संगीताला जसा आध्यात्मिक पाया आहे, तसा फ्यूजन आणि पाश्‍चात्त्य संगीत यांना नाही. फ्यूजन आणि पाश्‍चात्त्य संगीतातील घटक (गायन, वादन, कलाकार, गीताचे बोल इत्यादी) असात्त्विक असल्यामुळे त्याकडे नकारात्मक स्पंदने आकृष्ट होतात.

चाचणीतील फ्यूजन आणि पाश्‍चात्त्य संगीत यांवर आधारित नृत्यामुळे वातावरणात नकारात्मक स्पंदने आकृष्ट झाली. चाचणीतील दोन्ही साधक-दर्शक, तसेच शर्वरी यांच्यावर त्याचा पुढीलप्रमाणे नकारात्मक परिणाम झाला.

१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक आणि शर्वरी यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली अन् त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अल्प झाली.

थोडक्यात ‘कु. शर्वरी कानस्कर हिने सादर केलेल्या ‘फ्यूजन’ अन् पाश्‍चात्त्य संगीत यांवर आधारित नृत्याचा साधक-दर्शकांवर, तसेच तिच्या स्वतःवर नकारात्मक परिणाम झाला. याउलट तिने सादर केलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्याचा (कथ्थक नृत्याचा) त्या सर्वांवर सकारात्मक परिणाम झाला’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१८.६.२०१९)

ई-मेल : [email protected]

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक