शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे भेसळयुक्त दूध जप्त

भेसळीच्या संशयावरून शेळकेवाडी (तालुका कवठेमहांकाळ) येथे ४ फेब्रुवारी या दिवशी मे. सटवाई दूध संकलन केंद्रावर धाड टाकून एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

भोजनातून गुंगीचे औषध देऊन ९ कलाकारांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची चोरी

हे सर्व कलाकार लातूर जिल्ह्यातील राचनवाडी येथील असून हे सर्वजण देवीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

सातारा पालिका प्रशासन मढ्याच्या टाळूवरचे लोणी खात आहे ! – नगरसेवक अण्णा लेवे

कोरोना आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली नगरपालिकेने मनाला वाटेल तसे साहित्य खरेदी केले आहे. ५०० मास्क खरेदीचे वाटप झालेच नाही. कोरोना प्रतिबंधक साहित्याच्या खरेदीच्या भ्रष्टाचारात प्रशासनाचे हात बरबटले आहेत.

सातारा येथे जिल्हा सत्र न्यायालयाजवळील पालापाचोळ्यास आग

सातारा-कोरेगाव रस्त्यावरील जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय मार्गावरील ओढ्याजवळ झाडांचा पालापाचोळा साचला होता. त्याला ३ फेब्रुवारीला रात्री १० वाजता अचानक आग लागली.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.

बीड येथे ठेकेदाराकडून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

तालुक्यातील घारगाव ते अंजनवती या ६ ते ७ किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याविषयी अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत.

पहिल्याच दिवशी मास्क न घालणार्‍या लोकलच्या ५१५ प्रवाशांवर कारवाई

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास अनुमती दिल्यानंतर पहिल्याच दिवशी मास्क न घालणार्‍या लोकलच्या ५१५ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ३९६ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करतांना पकडण्यात आले आहे.

गंगापूर येथे भव्य मिरवणुकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची स्थापना

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूच्या अश्‍वारूढ पुतळ्याची ३० जानेवारी या दिवशी भव्य मिरवणुकीद्वारे स्थापना करण्यात आली

भिवंडी न्यायालयात न्यायाधिशांसमोरच अधिवक्त्यांमध्ये मारहाण; पत्रकाराला धमकी

एका खटल्याची सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी भिवंडी न्यायालयात चालू असतांना आरोपी आणि फिर्यादी यांची दोन्ही अधिवक्ते त्यांची बाजू मांडत होते. त्या वेळी न्यायाधिशांच्या समोरच अधिवक्ता शैलेश गायकवाड आणि अधिवक्ता अमोल कांबळे यांच्यात वाद झाला.

अश्‍लील वक्तव्य केल्याच्या प्रकरणी बुलढाणा येथील शिवसेनेच्या आमदारांविरुद्ध तक्रार प्रविष्ट !

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करत असतांना येथील शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी माझ्याप्रती अश्‍लील वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा,..