
कोल्हापूर – येथील लक्ष्मीपुरी परिसरातील एका यात्री निवासमध्ये ३ फेब्रुवारी या दिवशी भोजनातून गुंगीचे औषध देऊन ९ कलाकारांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले. सकाळी व्यवस्थापकाने खोली पहाणी करण्यासाठी उघडली असता हा प्रकार उघडकीस आला. हे सर्व कलाकार लातूर जिल्ह्यातील राचनवाडी येथील असून हे सर्वजण देवीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी याचे अधिक अन्वेषण केले असता रात्री भोजनामध्ये गुंगीचे औषध घालून कलाकारांना बेशुद्ध करण्यात आले आणि सर्वांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याचे उघड झाले. ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ