केसरीया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा याच्या साहाय्याने झाली कारवाई

मडगाव, २२ एप्रिल (वार्ता.) – देहली येथून मडगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेतून ‘पार्सल’द्वारे इतर मांसासमवेत अनधिकृतपणे गोमांसही आणले जाते. अशाच प्रकारे कोकण रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ६ वर इतर मांसासमवेत अनधिकृतपणे गोमांसही आणण्यात आले होते. हा प्रकार केसरीया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा यांनी पोलिसांच्या नजरेस आणून दिल्यानंतर कोकण रेल्वे पोलिसांनी कारवाई करून संबंधित ठिकाणावरून ८०० किलो गोमांस कह्यात घेतले आहे. हे गोमांस असलेले ‘पार्सल’ नेण्यासाठी आलेला पणजी येथील अख्तर बेपारी याला केसरीया हिंदु वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देहली येथून प्रत्येकी ७० किलोची ११ ‘पार्सले’ मडगाव रेल्वेस्थानकावर पाठवण्यात आली होती. २ दिवसांच्या प्रवासानंतर या ‘पार्सल’मधून पाणी वहात होते आणि त्याला दुर्गंधीही येत होती. कोकण रेल्वे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यावरील कारवाई हे गोमांस माफियांचे षड्यंत्र ! – राजीव झा
मडगाव येथील कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गुडलर हे सातत्याने रेल्वेमधून अवैधरित्या केल्या जाणार्या गोमांसाच्या वाहतुकीवर कारवाई करत होते आणि म्हणून षड्यंत्र रचून पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांना भ्रष्टाचार्याच्या प्रकरणात अडकवण्यात आले, असा आरोप केसरीया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा यांनी केला आहे. गोमांस माफियांवर प्रथम कारवाई करावी, अशी मागणी राजीव झा यांनी केली आहे.