लाच घेणार्‍या ३ पोलीस शिपायांचे निलंबन

बाणेर पोलीस स्टेशन

पुणे – बाणेर पोलीस ठाण्यातील ३ पोलीस शिपायांनी ५ सहस्र रुपयांची लाच मागून ३ सहस्र रुपये घेतल्याच्या आरोपावरून त्यांचे निलंबन केले आहे. ‘कॉप्स २४’चे बीट मार्शल म्हणून हे तिघे काम करत होते. संतोष शिंदे, प्रतीक त्रिंबके आणि दिनेश इंगळे अशी त्यांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

लाच घेणार्‍यांवर वचक बसेल अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी !