कार्यकर्त्यार्ने दारू पिऊन धक्काबुक्की केल्याचा यादव यांचा दावा !
पाटीलीपुत्र (बिहार) – बिहार सरकारमधील वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात तेज प्रताप यादव एका युवकाचा गळा पकडून त्याला धक्का देतांना दिसत आहे. हा युवक यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तेज प्रताप यादव चारा घोटाळ्यात शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र आहेत.
लालू जी के लाल ने राजद कार्यकर्ताओं को मारकर किया बेहाल!
राजद के कार्यकर्ताओं की हालत गुलाम की तरह हो गई है। लात-मुक्का खाकर भी पीढ़ी दर पीढ़ी एक परिवार की ही गुलामी करनी है।#ShameOnThagbandhan #Corrupt_Lalu_Family pic.twitter.com/zw6CIfR6Vt
— BJP Bihar (@BJP4Bihar) August 24, 2023
या प्रकरणी तेज प्रताप यादव म्हणाले की, सुमंत यादव असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो मद्याच्या नशेत होता आणि त्याने मला धक्काबुक्की केली. त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो धक्काबुक्की करत होता. नंतर प्रशासनाने त्याला तेथून हटवले. या घटनेच्या संपूर्ण चित्रीकरणातील माझी अपकीर्ती होईल, इतकाच भाग प्रसारित करण्यात आला. असे करणार्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे, तसेच सुमंत यादव याच्यावर कारवाई करण्याची मागणीही मी केली आहे.
संपादकीय भूमिकाबिहारमध्ये जंगलराज का आले आहे ?, हे या घटनेतून लक्षात येते ! |