(म्हणे) ‘श्रीरामचरितमानस’ हे मशिदीमध्ये लिहिण्यात आले होते !’ – राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव यांचा ‘शोध’ !

राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव

पाटलीपुत्र (बिहार) – श्रीराममंदिराची लोक चर्चा करत आहेत. ‘श्रीरामचरितमानस’ जेव्हा लिहिण्यात आले होते, तेव्हा ते एका मशिदीमध्ये लिहिण्यात आले होते. तुम्ही इतिहास डोकावून पाहू शकता. त्या वेळी तुमचे हिंदुत्व संकटात नव्हते का ? मोगलांच्या काळात हिंदू संकटात नव्हते का ?, असे विधान बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव यांनी केले. या विधानानंतर वाद होऊ लागल्याने सरकारमधील जनता दल (संयुक्त) या सहकारी पक्षाने ‘या विधानाशी आपला काही संबंध नाही’, असे म्हटले आहे. भाजपने यादव यांच्यावर टीका केली आहे.

संपादकीय भूमिका

यादव अन्य धर्मियांचा धर्मग्रंथ मंदिरात लिहिण्यात आला होता, असे म्हणण्याचे धाडस करू शकणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय होतील, हे त्यांना ठाऊक आहे !