पॅलेस्टाईनवरील आक्रमण थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याची  विरोधी पक्षांची घातक मागणी !

  • भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली पॅलेस्टाईनच्या भारतातील राजदूतांची भेट !

  • इस्रायली लोकांवर केलेल्या आक्रमणांविषयी अवाक्षरही नाही !

भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली पॅलेस्टाईनच्या भारतातील राजदूतांची भेट

नवी देहली – आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या शांतीपूर्ण समाधानासाठी प्रयत्न करायला हवेत. यासह पॅलेस्टिनी लोकांच्या अधिकारांचा सन्मान करणे, तसेच गाझा पट्टीच्या लोकांना मानवीय साहाय्य तात्काळ पोचवणे, यावर भर दिला पाहिजे. यासाठी इस्रायलवर दबाव आणला पाहिजे, असे संयुक्त वक्तव्य भारतातील विरोधी राजकीय पक्षांनी प्रसारित केले आहे. या वक्तव्यामध्ये हमासच्या आतंकवाद्यांनी केलेल्या भयावह आक्रमणात मारल्या गेलेल्या इस्रायलच्या १ सहस्र ३०० नागरिकांविषयी अवाक्षरही काढण्यात आलेले नाही.

१. विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भारतातील पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान महंमद जाबेर अबुलहैजा यांची १६ ऑक्टोबर या दिवशी भेट घेतली. त्यानंतर वरील वक्तव्य प्रसारित करण्यात आले. या शिष्टमंडळात काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर, श्रीकांत जेना, भाकपचे प्रमुख डी. राजा, माकपचे नेते नीलोत्पल बसू, बसपचे खासदार दानिश अली, राजदचे खासदार मनोज झा, समाजवादी पक्षाचे जावेद अली, जनता दल संयुक्तचे महासचिव केसी त्यागी आदी सहभागी झाले होते. यानंतर नेत्यांनी एक संयुक्त वक्तव्य प्रसारित करत युद्ध थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर दिला.

२. शिष्टमंडळाने प्रसारित केलेल्या संयुक्त वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, आम्ही गाझा पट्टीत चालू असलेले संकट आणि पॅलेस्टिनी लोकांचे दु:ख यांवर गंभीर चिंता व्यक्त करतो. इस्रायलद्वारे गाझा पट्टीवर चालू असलेली अंधाधुंद बाँबफेकीची कठोर शब्दांत निंदा करतो. यातून इस्रायलचा नरसंहार करण्याचा प्रयत्न होत आहे.

३. यानंतर या शिष्टमंडाळतील नेत्यांनी ‘एक्स’द्वारे गाझाच्या निष्पाप मुलांसह पॅलेस्टिनी जनतेची कशा प्रकारे हत्या करण्यात येत आहे, याची छायाचित्रे प्रसारित केली. ‘इस्रायलचा मूर्खपणा थांबला पाहिजे’, असेही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

संपादकीय भूमिका

  • पॅलेस्टाईन हे इस्लामी राष्ट्र असल्यानेच भारतातील विरोधी पक्षांना इस्रायलविषयी पोटशूळ उठला आहे. तेथील अरब लोकांची तळी उचलून त्यांना  भारतीय मुसलमानांना खूश करायचे आहे !
  • काँग्रेस, साम्यवादी आदी राजकीय पक्ष यांचे प्रत्येक कृत्य हेे हिंदूंना मारक ठरले आहे. त्यामुळे ते इस्रायलींवरील अत्याचारांवर कधीतरी बोलतील का ?

जसा इंग्लंड इंग्रजांचा, फ्रान्स फ्रेंच लोकांचा, तसा पॅलेस्टाईन अरब लोकांचा ! – विरोधी पक्ष

विरोधी पक्षांनी संयुक्त वक्तव्यात पुढे लिहिले आहे की, म. गांधी यांनी जे सांगितले आहे की, ‘इंग्लंड इंग्रजांचा आहे, फ्रान्स फ्रेंच लोकांचा आहे’. त्याच आधारे पॅलेस्टाईन हा अरब लोकांचा आहे. पॅलेस्टाईनचे सार्वभौमत्वाला मान्यता दिली गेली पाहिजे. पॅलेस्टिनी लोक गेली ७५ वर्षे पुष्कळ यातना सहन करत आले आहेत, आता या यातना समाप्त होण्याची वेळ आली आहे.

संपादकीय भूमिका

असे आहे, तर ‘भारत हा हिंदूंचा’, हेही निधर्मीवादी विरोधी पक्षांनी मान्य केले पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर आता हिंदूंनीही भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !