|
पाटलीपुत्र (बिहार) – महिला आरक्षणामध्ये अतिमागास, मागास आणि दुसरा कोटाही दिला गेला पाहिजे. तसे झाले नाही, तर महिला आरक्षणाच्या नावावर ‘पावडर’, ‘लिपस्टिक’ लावणार्या आणि ‘बॉब कट’ केलेल्या महिलाच पुढे जातील, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या संदर्भात केले. यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.
‘पाउडर-लिपस्टिक और बॉब कट वाली महिलाएँ ले जाएँगी आरक्षण के फायदे’: RJD वाले अब्दुल का विवादित बयान, विरोध होने पर बोले – मैली साड़ी वाली महिलाओं को समझा रहा था#AbdullBariSiddiqui #RJD #WomenReservationBill https://t.co/KiaK4P7gCe
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 30, 2023
बिहारच्या मुझफ्फरपूर येथील भाजपचे आमदार जनक सिंह यांनी सिद्दीकी यांना न्यायालयात खेचणार असल्याचे म्हटले आहे. ‘सिद्दीकी यांसारखे लोक नेते कसे काय होतात ? अशा मानसिकतेचे लोक महिलांना पुढे जातांना पाहू शकत नाहीत. हीन पातळीचे राजकारण करतात. सिद्दीकी यांनी त्यांच्या वक्तव्यावरून क्षमा मागितली पाहिजे, अशी टीका सिंह यांनी केली आहे.
(सौजन्य : Republic Bharat)
संपादकीय भूमिका
|