WAQF Amendment Bill : राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयकावर रात्री उशिरापर्यंत चर्चा चालू !

लोकसभेत २ एप्रिलला रात्री अडीच वाजता संमत झाले विधेयक !

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केले

नवी देहली : लोकसभेत २ एप्रिल या दिवशी सकाळी मांडण्यात आलेले वक्फ सुधारणा विधेयक रात्री अडीच वाजता मतदान होऊन ते २८९ विरुद्ध २३२ मतांनी संमत करण्यात आले. त्यानंतर ३ एप्रिल या दिवशी सकाळी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत हे विधेयक सादर केले. यावरही रात्री उशिरापर्यंत चर्चा चालू होती. सकाळपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या सदस्यांनी यावर त्यांची मते मांडली.

भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे का ? – निशिकांत दुबे, खासदार, भाजप

लोकसभेत विधेयकावर चर्चा चालू असतांना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले की, वर्ष १९५४ मध्ये संसदेच्या सदस्यांनी विधेयकाला विरोध करूनही काँग्रेस पक्षाने मुसलमानांना खुश करण्यासाठी वक्फ कायदा संमत केला. भारतात ज्या प्रमाणात वक्फला अधिकार आहेत, तसेच अधिकार कुठल्याही दुसर्‍या देशात देण्यात आलेले नाहीत. तुम्हाला भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे का ?