२ सहस्र मूल्‍यांच्‍या नोटांच्‍या छपाईसाठी खर्च झाले होते १२ सहस्र ८७७ कोटी रुपये !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

नवी देहली : केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्‍ये नोटाबंदीच्‍या काळात चलनात आणलेल्‍या २ सहस्र रुपयांच्‍या नोटा रिझर्व्‍ह बँकेने गेल्‍या वर्षी चलनातून बाद केल्‍या. या नोटांची छपाई करणे आणि त्‍या नष्‍ट करणे यांसाठी १२ सहस्र ८७७ कोटी रुपये खर्च आला होता, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी राज्‍यसभेत विचारण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नावर दिले.