राज्यसभेत खासदार सुधा मूर्ती यांची मागणी
नवी देहली – नुकत्याच राज्यसभेत नियुक्त करण्यात आलेल्या खासदार सुधा मूर्ती यांनी २ जुलैला प्रथमच राज्यसभेत भाषण केले. ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी असलेल्या सुधा मूर्ती यांनी महिला आरोग्य आणि भारतातील पर्यटनस्थळे या विषयांवर सभागृहाचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, देशांतर्गत पर्यटनावर बोलतांना सुधा मूर्ती म्हणाल्या की, भारतात ४२ जागतिक वारसास्थळे असून आणखी ५७ स्थळांचा जागतिक वारसास्थळ म्हणून विचार झाला पाहिजे. यामध्ये कर्नाटकच्या श्रवणबेळगोळ येथील बाहुबली मूर्ती, त्रिपुरातील उनाकोटी खडकावरील कोरीव काम, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे गड, मध्यप्रदेशात असलेली मितावली येथील चौसष्ठ योगिनी मंदिरे इत्यादींचा समावेश करता येईल.
महिलांचा गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी त्यांना लस द्या !
मूर्ती पुढे म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांचा मृत्यूदरही वाढला आहे. या रोगाला प्रतिबंधित करण्यासाठी पाश्चात्त्य देशांत ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लस दिली जाते. याने भविष्यात संभाव्य कर्करोग टाळता येऊ शकतो. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे. सरकारने कोरोना महामारीच्या काळात एक अत्यंत मोठी लसीकरण मोहीम हाताळली आहे. त्यामुळे ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम आखणे फार कठीण नाही. हे लसीकरण फार महागही नाही. ते १ सहस्र ४०० रुपयांत उपलब्ध असून सरकारने हस्तक्षेप करून वाटाघाटी केल्या, तर ही लस ७००-८०० रुपयांतही मिळू शकते.
संपादकीय भूमिकामुळात सरकारकडे अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून अशांचे जागतिक वारसास्थळ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! |