शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या भाषणाच्‍या जुन्‍या ध्‍वनीफितींच्‍या संदर्भात राज ठाकरे यांच्‍याशी चर्चा करणार ! – उद्धव ठाकरे

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी वर्ष १९९० च्‍या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे त्‍यांनी ग्रामोफोनमध्‍ये ध्‍वनीमुद्रित करून संग्रहित केली होती.

मनसेच्या नवीन उपक्रमाचा चिपळूण येथे शुभारंभ 

‘नाका तेथे शाखा’ या उपक्रमाचा शुभारंभ पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभहस्ते पार पडला.

मी तडजोड करणार नाही ! – राज ठाकरे

मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्‍याच्‍या चर्चा चालू असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर वरील विधान राज ठाकरे यांनी केले आहे.

वर्तमान राजकीय परिस्थितीने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे संपूर्ण देशात हसे केले ! – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

जिल्ह्यातील नाणारचा प्रकल्प ५ दिवसांत बारसूला हालवला जातो. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला लागणारी जमीन ५ दिवसांत कुठून मिळाली? आज अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात लुटमार चालू आहे.

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाविषयी विस्तृतपणे चर्चा करू ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

समितीच्या वतीने श्री. ठाकरे यांना ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. ‘हलाल अर्थव्यवस्थेविषयी आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली !

या भेटीविषयी अद्याप एकनाथ शिंदे किंवा राज ठाकरे यांच्‍याकडून अधिकृतपणे वाच्‍यता करण्‍यात आलेली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्‍यास शिवसेनेला अडचण येऊ शकते, अशी चर्चा आहे.

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट !

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ६ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची दैनिक ‘सामना’च्‍या कार्यालयात भेट घेतली. तत्‍पूर्वी त्‍यांनी गाडीने एकत्र प्रवास केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट : अजित पवार यांच्यासह ९ नेते सरकारमध्ये सहभागी !

सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.

लोक बघ्याच्या भूमिकेत का गेले ? याचे आश्‍चर्य वाटते ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

असे प्रकार तुमच्या आजूबाजूला घडत नाहीत ना ? याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

राज ठाकरे यांना वाढदिवसाला कार्यकर्त्‍यांकडून अनोखी भेट !

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांना १४ जून या दिवशी त्‍यांच्‍या वाढदिवसानिमित्त एका कार्यकर्त्‍याने चक्‍क औरंगजेब अन् मशिदीवरील भोंग्‍याचे चित्र आणि त्‍यावर फुली मारलेला केक भेट दिला.