नाशिक – येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. ‘अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अजूनही का झाले नाही ? राज्य माझ्या हातात दिल्यास, तर एकसाथपणे मशिदींवरील भोंगे बंद करण्यात येतील’, अशी चेतावणी राज ठाकरे यांनी दिली.
राज ठाकरे म्हणाले की, मनसेने जी आंदोलने केली, त्या आंदोलनांचा शेवट झाला. दूरभाषवर मराठी ऐकायला येऊ लागले. ६५ पथकरनाके बंद झाले. मराठी पाट्या लावण्यात आल्या. अनेक प्रार्थनास्थळांवरील भोंगे बंद झाले. उद्धव ठाकरे सरकारने माझ्या १७ सहस्र महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे नोंद केले. हे स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात. मग मनसेच्या सैनिकांवर गुन्हे का नोंद केले ? समुद्रावर अनधिकृत मशीद बांधली जात होती. ती मशीद आम्ही एका रात्रीत पाडायला लावली. आमची भूमिका स्वच्छ आणि प्रामाणिक होती अन् आहे. मला माता-भगिनी ‘आता विश्वास तुमच्यावर आहे’, असे सांगतात. तो टिकवणे, हे दायित्व आहे.