खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे ‘पठाण’ चित्रपटाचा फलक फाडला !
खामगाव येथील ‘सनी पॅलेस’ या चित्रपटगृहात लावण्यात आलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी फाडला, तसेच ‘अभिनेता शाहरूख खान मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या.
खामगाव येथील ‘सनी पॅलेस’ या चित्रपटगृहात लावण्यात आलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी फाडला, तसेच ‘अभिनेता शाहरूख खान मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या.
येथील भागवत चित्रपटगृह येथे २७ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ‘पठाण’ चित्रपटाचे पोस्टर (भित्तीपत्रक) काढून चित्रपटाचा निषेध केला.
देशविरोधी अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटासह त्याचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच चित्रपट गृहाचे चालक आणि मालक यांना देण्यात आले.
२४ जानेवारी या दिवशी सातारा शहरातील ‘राजलक्ष्मी’ आणि ‘सेव्हनस्टार’ चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, तसेच भाजप आणि भाजपप्रणित व्यापारी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शाळा-महाविद्यालये येथे राष्ट्रप्रेमाचे धडे न दिल्याने आजचे तरुण देशासमोरील समस्यांना वेळ देण्याऐवजी भारतीय संस्कृतीचे हनन करणार्या चित्रपटांचे उदात्तीकरण करत आहेत, हे दुर्दैवी आहे !
विशाळगडावर होणारे अतिक्रमण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पुरातत्व विभागास दिसत नाही का ? प्रत्येक वेळी हा विभाग कुणीतरी तक्रार केल्यावरच कारवाई करणार आहे का ?
‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ बंदही पाडण्यात आले आहेत.
या प्रार्थनाकक्षाचा केवळ मुसलमानांकडून होणारा वापर पहाता भविष्यात यावर मुसलमानांनी दावा करून ते ठिकाण अधिकृत प्रार्थनास्थळ घोषित केल्यास वाटणार नाही !