Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !

शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण

 

मुंबई – शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील सूत्रधाराला भिवंडी पोलिसांनी बिहार येथून अटक केली. ब्रिजेंद्र गुप्ता असे त्याचे नाव असून तो प्रश्नपत्रिका फुटीची मोठी यंत्रणाच चालवत असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी देशभरात अनेक ठिकाणी धाडी घातल्या होत्या. या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यापासून ब्रिजेंद्र गुप्ता फरार होता. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणामुळे २८ जून या दिवशी शिक्षक पात्रता परीक्षा रहित करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी राजीव कुमार, आकाश कुमार आणि धीरज कुमार यांना आधीच अटक केली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात १२ जणांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

या प्रकरणातील संबंधित आरोपींना कठोर शिक्षा झाल्यासच भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांना आळा बसेल !