नवी देहली जागतिक पुस्तक मेळाव्या’त ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा डाव हिंदुत्वनिष्ठांनी उधळला !

युनायटेड हिंदू फ्रंटने दिल्ली बुक फेअरमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांवर धर्मांतराचा कट रचल्याचा आरोप केला, कारवाईची मागणी केली.

नवी देहली – येथील प्रगती मैदानातील ‘नवी देहली जागतिक पुस्तक मेळाव्या’त ख्रिस्त्यांकडून चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न जागृत हिंदुत्वनिष्ठांनी उधळून लावला. त्यांनी स्टॉलवर लावलेली ‘फ्री होली बायबल’ची भित्तीपत्रके फाडली, तसेच तेथील पुस्तकांच्या काही प्रती हस्तगत केल्या.

येथील प्रगती मैदानावर २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत ‘नवी देहली जागतिक पुस्तक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी ‘गिडियन्स इंटरनॅशनल’ या ख्रिस्ती संस्थेच्या वतीने पुस्तक स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवर २४ फेब्रुवारीपासून  बायबलचे विनामूल्य वितरण चालू होते. याविषयी माहिती मिळाल्यावर ३० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांना ‘बायबलची विक्री बंद करावी आणि हिंदूंचे धर्मांतर थांबवावे’, अशी मागणी केली. या वेळी त्यांनी ‘जय श्रीराम’ ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. हिंदुत्वनिष्ठांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तेथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. तेथील काही साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी हिंदुत्वनिष्ठांना विरोध करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचे काही चालले नाही. त्यानंतर तेथे आयोजकांनी नियमित सुरक्षेसाठी २ सुरक्षारक्षक दिले. या वेळी ख्रिस्त्यांनी प्रसारमाध्यमांना, ‘अन्य धर्मीय भगवद्गीता हा ग्रंथ निःशुल्क वाटत आहेत. त्याचप्रमाणे आम्हीही बायबल वाटत आहोत’, असे  सांगितले. (हिंदू भगवद्गीता निःशुल्क वाटत असले, तरी त्यांचा हेतू हा अन्य धर्मियांचे धर्मांतर करणे, हे नसते. ख्रिस्ती मात्र बायबलचे निःशुल्क वाटप करून त्यांच्या धर्माचा प्रसार करून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

धर्मांतर करण्यासाठी प्रत्येक संधीचा लाभ उठवणारे कावेबाज ख्रिस्ती !