पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण

  • पत्रकारावर जीवघेणे आक्रमण होणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी धोकादायक !

  • आरोपींवर गुन्हे नोंद !

रायगड – जिल्ह्यातील गोरेगाव येथील पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर १९ जुलैच्या रात्री १२ च्या सुमारास जीवघेणे आक्रमण झाले होते. ते रात्री जेवणासाठी लोणेरे येथील हॉटेलमध्ये गेले होते. त्यांना पाहून तेथे आधीच उपस्थित किशोर म्हसकर, बळवंत टेंबे आणि आबा धसाडे यांनी शिवीगाळ केली. त्यामुळे त्याचे रूपांतर वादात झाले. या वेळी किशोर म्हसकर आणि बळवंत टेंबे यांनी हाताने आणि लोखंडी खुर्चीने त्यांच्यावर आक्रमण केले. यामध्ये ते घायाळ झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे वैद्यकीय उपचार चालू आहेत. पोलीस दलाने घटनास्थळी धाव घेऊन पीडित पत्रकाराच्या तक्रारीनुसार माहिती घेत आरोपींना अटक करून गुन्हे नोंद केले आहेत. पत्रकार संघटना, तसेच विविध सामाजिक संघटना यांनी आणि गोरेगाव येथील जनतेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.