११ राज्यांतील नागरिकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक
दोघांवर गुन्हा नोंद !
(राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल म्हणजे ऑनलाईन अथवा सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांना घरबसल्या तक्रार प्रविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने बनवलेले राष्ट्रीय संकेतस्थळ)

वणी (जिल्हा यवतमाळ) – ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची लूटमार करणार्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांचे जाळे यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी तालुक्यापर्यंत पसरले आहे. ११ राज्यांतील नागरिकांची फसवणूक करून मिळवलेली लाखो रुपयांची रक्कम वणी येथील एका संशयास्पद बँक खात्यात वळती करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, हरियाणा, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तरप्रदेश आणि बंगाल या ११ राज्यांतील पीडित नागरिकांचे पैसे या खात्यात जमा झाले होते. ‘वरलक्ष्मी ट्रान्सपोर्ट’च्या नावे चालवल्या जाणार्या ॲक्सिस बँकेच्या खात्यात १४ ते १७ ऑगस्ट २०२५ या ४ दिवसांत २५ लाख ९९ सहस्र रुपये जमा झाले. ही रक्कम तातडीने इतर खात्यांमध्ये आणि ‘यूपीआय’द्वारे पुढे वळवून हडप करण्यात आली. गणेश गोहोकर आणि पवन चाहणकर या २ खातेदारांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
आर्णी तालुक्यातील दाभडी येथील रत्नपाल कांबळे याच्या खात्यात ५ लाख ९६ सहस्र रुपयांची संशयास्पद उलाढाल झाल्याचे ‘राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल’द्वारे उघड झाले. फसवणुकीचा पैसा स्वतःच्या खात्यावर घेतल्याप्रकरणी त्याच्यावरही गुन्हा नोंद झाला.
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !