
माशेल, २५ जुलै (वार्ता.) – गोव्यातील पर्यटन खात्याच्या ‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा २४ जुलैपासून खांडोळा येथील श्री महागणपति मंदिरापासून शुभारंभ झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ केला. याप्रसंगी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची उपस्थिती होती. गोव्याच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाची ओळख करून देणे आणि समुद्रकिनार्यांपलीकडील गोव्याचे सांस्कृतिक अन् धार्मिक वैभव पर्यटकांसमोर मांडणे, या उद्देशाने गोवा सरकारने हा उपक्रम राबवला आाहे. या योजनेच्या अंतर्गत पर्यटकांना राज्यातील खांडोळा येथील श्री महागणपति मंदिर, माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिर, सावई-वेरे येथील श्री अनंत मंदिर, तांबडी सुर्ला येथील श्री महादेव मंदिर, सत्तरी तालुक्यातील ब्रह्माकरमळी येथील श्री ब्रह्मदेव मंदिर, सांखळी येथील श्री संस्थान दत्तवाडी, नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर; पैंगीण, काणकोण येथील श्री परशुराम मंदिर; फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळीकरीण मंदिर, जांबावली येथील श्री दामोदर मंदिर आणि मडगाव येथील श्री हरि मंदिर या ११ ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन घेता येणार आहे.
याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘एकादश तीर्थयात्रेच्या माध्यमातून गोव्याच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव होणार आहे. मंदिरांच्या पायाभूत सुविधांचा विकास, पवित्र तीर्थस्थळांना परस्पर जोडणारी सशक्त व्यवस्था आणि ‘गोवा पर्यटन विकास महामंडळा’च्या परिवर्तनशील उपक्रमांद्वारे श्रद्धा, संस्कृती आणि जनमानस यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.’’ पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या वेळी ‘एकादश तीर्थयात्रा’ योजना कशी उदयास आली, याविषयी माहिती दिली.
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण