गुुन्‍हा नोंदवण्‍याचे जळगाव न्‍यायालयाचे पोलीस प्रशासनाला आदेश !

विटनेर (जिल्‍हा जळगाव) येथे दर्ग्‍यावर पाकिस्‍तानी ध्‍वज फडकवल्‍याचे प्रकरण

जळगाव – तालुक्‍यातील विटनेर येथील एका दर्ग्‍यावर पाकिस्‍तानी ध्‍वज फडकवण्‍यात आल्‍याची संतापजनक घटना १८ जानेवारीला सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी जळगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि त्‍यांचे सहकारी यांनी हा ध्‍वज तातडीने कह्यात घेतला होता. या प्रकरणी विधी शाखेचे अभ्‍यासक, तसेच विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दलाचे जिल्‍हा कार्यकर्ता श्री. हेमंत गुरव यांनी तक्रार प्रविष्‍ट केली होती; मात्र गुन्‍हा नोंद झालेला नव्‍हता.

(राष्‍ट्रद्वेषी घटनेच्‍या विरोधात सातत्‍याने लढा देणारे श्री. हेमंत गुरव यांचे अभिनंदन ! – संपादक) १७ फेब्रुवारी या दिवशी जळगाव न्‍यायालयाने या प्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍याचे आदेश पोलिसांना दिले.

तक्रार देऊनही कारवाई न झाल्‍याने हे प्रकरण जळगाव न्‍यायालयात दाखल करण्‍यात आले. न्‍यायालयाने ‘या प्रकरणाची उच्‍चस्‍तरीय चौकशी करावी’, असे म्‍हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्न केला होता; पण न्‍यायालयाच्‍या आदेशामुळे तो साध्‍य झाला नाही.

पोलिसांकडून कारवाई न झाल्‍याने न्‍यायालयात धाव घ्‍यावी लागली ! – हेमंत गुरव, तक्रारकर्ता

मी प्रथम तक्रार प्रविष्‍ट केल्‍यावर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी हे प्रकरण दाबण्‍याचा प्रयत्न केल्‍याचे दिसून येत होते; पण कारवाई न झाल्‍याने मी पोलीस अधीक्षक साो. यांच्‍याकडेही तक्रार केली; पण तेथूनही कारवाई न झाल्‍याने मी जळगाव न्‍यायालयात धाव घेतली. न्‍यायालयाने देशद्रोहाच्‍या कलमांसह इतर कलमांखाली गुन्‍हा नोंदवण्‍याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, त्‍यांचे मी स्‍वागत करतो.

संपादकीय भूमिका 

प्रकरण बंद करण्‍याचा पोलिसांचा प्रयत्न अयशस्‍वी दर्ग्‍यावर पाकिस्‍तानी ध्‍वज फडकवण्‍यात आल्‍याचे प्रकरण दाबू पहाणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?