नळपाणीपुरवठा योजनेच्या कामातील हलगर्जीपणा भोवला

(काळी सूची – संबंधित व्यक्ती किंवा आस्थापन यांना सरकारी कंत्राट किंवा निविदा मिळण्यास बंदी.)
सिंधुदुर्ग – ‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत वैभववाडी तालुक्यातील कुसूर गावच्या मधलीवाडीतील नळपाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम करण्याचा कालावधी वाढवून देऊनही ठेकेदार निखिल महादेव घेवारी यांनी ते पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांचे नाव ३ वर्षांसाठी काळ्या सूचीत (ब्लॅक लिस्टमध्ये) टाकण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळवले आहे.
कुसूर, मधलीवाडीतील पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करण्यासाठी ३३ लाख ६१ सहस्र ६०५ रुपयांची निविदा काढण्यात आली होती. यासाठी ठेकेदार निखिल घेवारी यांची निविदा संमत करून २३ जानेवारी २०२२ या दिवशी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हे काम पूर्ण करण्याचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत होता; मात्र काम पूर्ण न झाल्याने ३१ मे २०२६ पर्यंत हा कालावधी वाढवून देण्यात आला. तरीही ठेकेदार घेवारी यांनी काम पूर्ण केले नाही. त्यामुळे या योजनेचा मक्ता रहित करून घेवारी यांचे नाव काळ्या सूचीत टाकण्यात आले.
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर