मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणार्या राज्यातील ६२३ शासकीय रुग्णालयांचे मूल्यांकन करून त्यांना नामांकन देण्यात येणार आहे. ‘स्टार रेटिंग प्रणाली’द्वारे हे मूल्यांकन करण्यात येईल. या रुग्णालयांद्वारे देण्यात येणारी सेवा आणि त्यांची गुणवत्ता राखली जावी, यासाठी नामांकन केले जाणार आहे. यामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णालयांचाही समावेश असणार आहे.
१. २० जिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, २४ स्त्री रुग्णालये, १०६ उपजिल्हा रुग्णालये, ३७३ ग्रामीण रुग्णालये, ७८ ट्रॉमा केअर सेंटर, १२ राज्य कामगार विमा रुग्णालये आणि २ संदर्भ सेवा रुग्णालये यांचा यामध्ये समावेश आहे.
२. सेवेची उपलब्धता आणि प्रतिसाद, निदानात्मक चाचण्या अन् औषधे, रुग्णालयाची कार्यक्षमता, वैद्यकीय सेवा, तसेच रुग्ण सुविधा आणि अनुभवावर आधारित अभिप्राय या विषयांवर आधारित रुग्णालयांचे मूल्यांकन होणार आहे.
३. विशेषापचार सेवा, डॉक्टर आणि अन्य साहाय्यक, औषध उपलब्धता, निदान चाचण्यांचा उपयोग, बाह्यरुग्ण विभागाची कार्यक्षमता, आंतररुग्ण विभागाची कार्यक्षमता, प्रसूतींची संख्या, मोठ्या शस्त्रक्रिया, रुग्णसुविधा आणि रुग्णांचे अभिप्राय या १० निकषांच्या आधारे मूल्यांकनाचे गुण दिले जाणार आहेत.
४. रुग्णालयांना समान गुणवत्ता मानदंडाविषयी प्रोत्साहित करणे, रुग्णालयाद्वारे दिल्या जाणार्या सेवेची नागरिकांना माहिती देणे, रुग्णालयांचा दर्जा टिकवून ठेवणे आणि सेवेत अधिक सुधारणा घडवून आणणे असा शासनाच प्रयत्न असेल. २४ जुलै या दिवशी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून याविषयीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री