
पणजी, २५ जुलै (वार्ता.) – राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतील (‘नीट’ परीक्षेतील) प्रश्नपत्रिकेच्या फुटीच्या प्रकरणी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २५ जुलै या दिवशी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावरील खात्यावरून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, ‘‘धर्मेंद्र प्रधान हे गेली ४ दशके सार्वजनिक जीवनात आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचे त्यागपत्र देण्याच्या धर्मेंद्र प्रधान यांच्या निर्णयातून त्यांना असलेली दायित्वाची जाणीव आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा दिसून येते. विद्यार्थी चळवळीतून त्यांच्या कार्याला प्रारंभ झाला आणि त्यांनी पेट्रोलियम अन् नैसर्गिक वायू मंत्रालयाचे नेतृत्वही केले आहे. या कार्यकाळात त्यांनी उज्ज्वला योजनेद्वारे कोट्यवधी घरांपर्यंत स्वच्छ इंधन पोचवले आहे. त्यानंतर त्यांनी शिक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळली. या प्रत्येक भूमिकेत त्यांनी राष्ट्रसेवेसाठी दृढ निश्चयाने आणि अथक परिश्रमाने काम केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यातील त्यांच्या नेतृत्वामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि सकारात्मक ठसा उमटला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी देशासाठी समर्पितपणे कार्य केलेले आहे आणि यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या उभारणीत धर्मेंद्र प्रधान यांचे पुढेही मोलाचे योगदान राहील, असा मला विश्वास आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि भावी वाटचाल यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !’’
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण