केंद्र सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य !

नवी देहली – केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासमवेत २५ जुलैला दुपारी झालेल्या तिसर्या बैठकीनंतर कॉकरोच जनता पक्षाने (‘सीजेपी’ने) त्याचे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. या बैठकीत सीजेपीच्या सर्व ३ मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे बैठकीनंतर जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या वेळी सौरभ दास यांनी आंदोलकांना ‘जंतरमंतरवर उपस्थित असलेल्या सर्व आंदोलकांनी आता घरी परतावे’, असे आवाहन केले.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्राची बातमी पसरताच जंतरमंतरवर आनंद साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी एकता झिंदाबाद’, ‘जय भीम’ अशा घोषणा दिल्या आणि राष्ट्रगीत गायले.
सरकारने मान्य केलेल्या मागण्या
अ. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे त्यागपत्र
आ. नीट प्रश्नपत्रिका फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई देणार
इ. जंतरमंतर येथील हिंसक आंदोलनाच्या वेळी विद्यार्थ्यांविरुद्ध नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेणार
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
न्यायालय म्हणजे २४ घंटे चालणारी मनोरंजन वाहिनी नव्हे ! – Supreme Court
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !