२६ जुलै या दिवशी ठाकरे बंधूंची मुंबईत आंदोलनाची घोषणा !

मुंबई – देशात क्रांतीची ठिणगी अद्यापही विझलेली नाही, हे देहली येथे युवकांनी दाखवून दिले आहे. मुंबईतही ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या विरोधात आंदोलन घेत आहोत. अभिजीत दीपके याच्याशी चर्चा करून या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. २५ जुलै या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते.
या वेळी राज ठाकरे म्हणाले, शिवाजी पार्क मैदानावर अभिजीत दीपके याला पाठिंबा देण्यासाठी सर्व जमणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे त्यागपत्र हा तरुणाईचा विजय आहे. युवाशक्तीपुढे सरकारला माघार घ्यावी लागली आहे.
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
गोमाता रक्षणासाठी २७ जुलैला देशव्यापी ‘गो सन्मान’ अभियान !