कॅनडामध्ये हिंदुद्वेषातून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे !

भारतीय वंशाच्या खासदाराने कॅनडातील संसदेत हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचे सूत्र केले उपस्थित !

भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या मिसिसोगा येथील श्रीराममंदिराची तोडफोड करून तेथे भारतविरोधी घोषणा लिहिल्याचे प्रकरण कॅनडाच्या संसदेत उपस्थित करण्यात आले. भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेत या घटनेचा निषेध करत ‘हिंदुद्वेषातून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे’, असे सांगत हिंदूविरोधी घटनेविषयी चिंता व्यक्त केली. तसेच या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

चंद्रा आर्य यांनी म्हटले की, भारत आणि हिंदूविरोधी संघटनांकडून कॅनडामध्ये हिंदूंची मंदिरे लक्ष्य केली जात आहेत. या संघटनांकडून सामाजिक माध्यमांतून कॅनडातील हिंदू नागरिकांना यापूर्वीच लक्ष्य करण्यात आलेले आहे. हिंदुद्वेष पसरवण्यात येत आहे. याच द्वेषापोटी हिंदूंची मंदिरे लक्ष्य केली जात आहेत. मिसिसोगा येथील श्रीराममंदिराची घटना दुःखदायक आहे. याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. कॅनडाचे नागरिक एक असल्याने आपण सर्व धार्मिक मान्यता आणि श्रद्धा यांच्या समवेत रहातो. पुढेही ही गोष्ट कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका 

भारतातील संसदेत जन्महिंदु खासदार कधी विदेशातील हिंदूंवरील आणि हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचे सूत्र उपस्थित करून सरकारला हिंदूंच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलण्यास सांगतात का ?