अधिकृत प्रमाणपत्र नसतांना रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप

कुडाळ – येथील रेल्वेस्थानक परिसरात ‘वेलनेस थेरपी कायरोप्रॅक्टर’ या नावाने उपचारकेंद्र चालवणार्या संतोष ज्ञानदेव सारंग (मूळ रहाणार सांताक्रुज, मुंबई आणि सध्या रहाणार विशांत कॉम्प्लेक्स, रेल्वेस्थानक रस्ता) यांना अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पदविका नसतांना वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी कुडाळच्या तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शरद शिरोडकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
१२ मार्च २०२६ या दिवशी कुडाळ पोलीस ठाण्यात मिळालेल्या एक निनावी अर्जामुळे हा प्रकार उघड झाला. या अर्जामध्ये कुडाळ रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या ‘विशांत कॉम्प्लेक्स’मध्ये उपचारकेंद्र चालू असून संतोष सारंग हे तेथे आलेल्या रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे हा अर्ज पुढील चौकशीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने नेमलेल्या समितीने केलेल्या चौकशीत संबंधित व्यक्तीकडे महाराष्ट्र वैद्यकीय कौन्सिलचे वैध प्रमाणपत्र नसल्याचे, तसेच महाराष्ट्र प्रबंधक अॅक्युपंक्चर परिषद, मुंबई यांच्याशी संबंधित प्रमाणपत्रे आणि पदविका यांची नोंदणी शासनाच्या नियमानुसार झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. सप्टेंबर २०२५ ते ३० मे २०२६ या कालावधीत सारंग यांनी शासनाचीही फसवणूक केली, तसेच रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने उपचार केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त