देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

शरद पवार

मुंबई – २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध उभे राहून सरकारला नैतिक दायित्व स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. देशातील लोकशाहीने कात टाकली असून ते श्रेय युवा पिढीला जाते, असे शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.