
नागपूर – विधान परिषद निवडणुकीतील लाजिरवाणी मतफुटी आणि उमेदवारांनी घेतलेली संशयास्पद माघार यांप्रकरणी प्रदेश काँग्रेसने स्थापन केलेली चौकशी समिती कागदावरच राहिली आहे. १५ दिवसांचा कालावधी उलटूनही काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे आणि आमदार भाई जगताप यांची ही समिती विदर्भात फिरकली नाही. यामुळे स्थानिक कार्यकर्ते संतप्त आहेत. ७ जुलै या दिवशी समिती घोषित करण्यात आली होती. ‘संबंधित नेत्यांना वेळ नसेल, तर प्रदेश काँग्रेसने तातडीने दुसरी समिती नेमावी’, अशी मागणी करण्यात येत आहे. संतप्त पदाधिकार्यांनी थेट अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे ई-मेल पाठवून या सर्व प्रकाराची तक्रार केली असून दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसची नाचक्की झाली. चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. भंडारा येथे माजी आमदार दिलीप बनसोड आणि यवतमाळ येथे साहेबराव कांबळे यांनी अचानक आवेदन मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. अमरावतीत काँग्रेस उमेदवार ऐनवेळी रुग्णालयात भरती झाले, तर नागपूर येथे पक्षाला हक्काची मतेही िटकवता आली नाहीत.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री