World Hindu Economic Forum : ‘वर्ल्‍ड हिंदु इकोनॉमिक फोरम’ची वार्षिक परिषद १३ ते १५ डिसेंबर होणार !

‘वर्ल्‍ड हिंदु इकोनॉमिक फोरम’च्‍या तीन दिवसांच्‍या वार्षिक परिषदेला वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्‍ड कन्‍व्‍हेन्‍शन सेंटर’ येथे प्रारंभ होत आहे. १३ ते १५ डिसेंबर अशी ती परिषद होईल.

दिव्‍यांग विद्यार्थ्‍यांचे कला-गुण विकसित करण्‍यासाठी प्रयत्न करावेत ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्‍हाधिकारी

दिव्‍यांगासाठीचे शासनाचे धोरण सकारात्‍मक आणि सर्वसमावेशक आहे. त्‍यांनी न्‍यूनगंड न ठेवता समाजात आत्‍मविश्‍वासाने वावरावे. त्‍यांची बुद्धीमत्ता आणि कला-गुण विकसित करण्‍यासाठी पालक अन् शाळा यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी येथे केले.

अहिल्यानगरच्या ह.भ.प. सुश्री रेणुका निसळ यांचे आजपासून ग्वाल्हेर येथे संगीत दत्त कथा निरूपण !

दत्त जयंतीनिमित्त ८ डिसेंबरपासून ग्वाल्हेर येथील ‘लाला का बाजार’ परिसरातील अन्वेकर दत्त मंदिर येथे नगरची कन्या ह.भ.प. सुश्री रेणुका निसळ यांचे ब्रह्मा विष्णु महेश कथा आणि रामकथेचे संगीत निरूपण आयोजित करण्यात आले आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा !

पुणे येथील याज्ञवल्क्य आश्रमात २७ नोव्हेंबर या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगोचित ‘समाधि साधन संजीवन नाम’, हे गीत सुभाष आंबेकर यांनी प्रस्तुत केले.

Total Liquar Ban Singar’s Demand : देशातील प्रत्येक राज्यात दारुबंदी घोषित करा !

देशातील जनता तंबाखु, मद्य आदी सेवन करते आणि त्यातून सरकारला अब्जावधी रुपयांचा महसूल मिळतो. जर सरकारला खरेच जनतेला अशा गोष्टींपासून दूर ठेवायची इच्छा असेल, तर यांवर बंदीच घालणे योग्य ठरील !

Brampton Triveni Mandir : सुरक्षेच्या कारणास्तव ब्रॅम्प्टन (कॅनडा) येथील त्रिवेणी मंदिराकडून भारतीय वाणिज्य दूतावासाने आयोजित केलेला कार्यक्रम रहित !

हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानी आक्रमण करत आहेत, हे स्पष्ट आहे. स्वतःची निष्क्रीयता लपवण्यासाठी कॅनडाचे पोलीस मंदिरावरच कार्यक्रम रहित करण्याचे खापर फोडत आहेत, असेच यातून लक्षात येते !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सवाचा समारोप सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

सनातन संस्थेचे प्रेरणास्थान असणारे प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव २६ ऑक्टोबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत साजरा करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

नारायणगाव (जिल्हा पुणे) – येथील थोर संत प.पू. काणे महाराज यांचा सातवा पुण्यतिथी उत्सव ४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत श्री. माधव मामा बारसोडे यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकावर पवमान आणि रूद्राभिषेक केला. त्यानंतर सकाळी ९.३० ते १० या वेळेत पादुका पूजन आणि … Read more

Ayodhya RamMandir Diwali : ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामललाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर अयोध्येत पहिलीच दिवाळी ! – पंतप्रधान

दिवाळीच्या सणाविषयी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या वेळी अयोध्या २८ लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे.

विरोध असूनही हणजूण कोमुनिदादची ३ मोठ्या कार्यक्रमांना मान्यता

स्थानिकांचा विरोध असूनही हणजूण कोमुनिदादच्या २७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोमुनिदाद भूमीत ३ मोठ्या ‘इव्हेंट’चे (कार्यकमांचे) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आली.