मुंबई – ‘वर्ल्ड हिंदु इकोनॉमिक फोरम’च्या तीन दिवसांच्या वार्षिक परिषदेला वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे प्रारंभ होत आहे. १३ ते १५ डिसेंबर अशी ती परिषद होईल. ‘थिंक इन द फ्युचर, फॉर द फ्युचर’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून विविध उद्योगक्षेत्रांमध्ये सहयोग, इनोव्हेशन (नाविन्य) आणि प्रगती यांना प्रेरणा देण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’चे सीईओ आशिषकुमार चौहान, ‘जिओ फायनान्शिअल सर्व्हिस’चे अध्यक्ष के.व्ही. कामत आणि ‘हिरानंदानी ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी हे यात प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.
या वर्षीच्या फोरममध्ये २४ सत्रे आणि १०० हून अधिक वक्ते सहभागी होतील. या कार्यक्रमासाठी प्रभावी नेतृत्व, उद्योजक, व्यवसाय क्षेत्रांमधील द्रष्टे असे जागतिक पातळीवरील १ सहस्रांहून अधिक अभ्यागत उपस्थित असतील.