मिरज, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे पट्टशिष्य-शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद महाराज यांचा १०५ वा पुण्यतिथी उत्सव शनिवार, ७ ऑक्टोबरपासून श्री ब्रह्मानंद महाराज संस्थान, श्री क्षेत्र नवबाग, कागवाड (जिल्हा बेळगाव) येथे प्रारंभ झाला. हा उत्सव १४ ऑक्टोबरपर्यंत चालेल. उत्सवकाळात ८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९ वाजता ‘श्री रामनाम तारक होम’ केला जाईल आणि १४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता ‘श्रीं’चा ‘निर्याण काल’ साजरा केला जाणार आहे. प्रतिदिन काकडआरती, रुद्र, आरती, महाप्रसाद असे नैमित्तिक कार्यक्रम होत आहेत. तरी ‘भाविकांनी श्रींचे दर्शन आणि प्रसाद यांचा लाभ घ्यावा’, असे आवाहन अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केले आहे.
सर्व भाविकांनी कीर्तन, प्रवचन, भजनादी कार्यक्रमांसाठी श्री. अरविंद गोसावी यांच्याशी दूरभाष (०२३३)२२२७४१७ आणि भ्रमणभाष ९३७०९२०६५५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.